Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
‘गांधी हिंदू, देशभक्त होते; त्यांनी स्वत:ला ‘हिंदू देशभक्त’ म्हणवून घेतलं नाही’, सरसंघचालकांवर आरोप
‘कोणी हिंदू असेल तर तो स्वाभाविकपणे देशभक्तच असेल’, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शशी थरूर यांनी वक्तव्य केलं आहे. एका वृत्तपत्रात त्यांनी विषयावर एक लेख लिहिला आहे.
महात्मा गांधीजींना हिंदू धर्मातील ज्या तत्वांचा त्यांना अभिमान होता ती संघ परिवारासारखी नव्हती. महात्मा गांधी हिंदू होते, देशभक्तही होते, पण त्यांनी स्वत:ला ‘हिंदू देशभक्त’ म्हणवून घेतले नाही. मुळात सरसंघचालकांचा रोख हा हिंदू धर्माकडे होता. पण प्रत्यक्षात महात्मा गांधीजींनी भारतीय संस्कृतीला अशा मिश्रणाच्या रूपात पाहत होते, जो वेद आणि पुराणांच्या काळापासूनच विविध इतर धर्मीय प्रभावांना स्वीकारत आला. पण हे संघ परिवाराला समजण्यापलीकडे असल्याचा यावेळी आरोपही शशी थरूर यांनी सरसंघचालकांवर केला आहे.





