भोसरी येथे 59 वर्षीय महिलेचा विनयभंग

ड्रेनेज पाईप बदलण्याच्या कारणावरून भोसरी येथे 59 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. भाडेकरूच्या घरात घाण पाणी जात असल्याने ड्रेनेज पाईप बदलण्याचे काम करत असताना झालेल्या वादात विनयभंग केला. गुरुवारी (दि.24) सकाळी अकराच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी याठिकाणी हि घटना घडली.
याप्रकरणी राहुल श्रीराम भोसले, अनिता राहुल भोसले व रंजना भोसले (सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 59 वर्षीय महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडेकरूच्या घरात घाण पाणी जात असल्याने फिर्यादी महिला या ड्रेनेज पाईप बदलण्याचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी राहुल भोसले याने फिर्यादी महिलेला कुणाला विचारून तुम्ही हे काम करताय असा जाब विचारला व आमचे सांडपाणी येथूनच जाणार असे म्हणून कामाला विरोध केला. आरोपीने फिर्यादी महिलेला दमदाटी करत विनयभंग केला. वाद सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादी यांच्या जावयाला देखील त्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक बुढे करत आहेत.




