breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे लावणार हजेरी

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलावली असली तरी या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना दिलीय. मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.

  • आरोग्यमंत्री राहणार उपस्थित…

पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.

  • मुख्यमंत्री घरुनच काम करत आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव मागील काही आठवड्यांपासून घरुनच काम करत आहेत. अनेक बैठकींना ते ऑनलाइन माध्यमातून घरुनच हजेरी लावत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा चांगलाच गजला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते राज्याचा कारभार, महत्वाच्या आढावा बैठकींना घरुनच उपस्थिती लावतायत.

  • महाराष्ट्रासहीत या राज्यांमुळे चिंता वाढली

१९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिलीय.

  • लॉकडाउनसंदर्भात निर्णयाची शक्यता…

सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनसंदर्भात विचार केली जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील असा दावा केला जातोय.

  • अधिक संसर्ग असणाऱ्या राज्यांसाठी वेगळे नियम?

दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा मोठी वाढ दिसून येत असल्याने करोना रुग्णसंख्या वाढणारी राज्ये आणि इतर राज्ये असे वेगळेवेगळे नियम लावण्यासंदर्भातील शक्यताही व्यक्त केली जातेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button