breaking-newsTOP Newsदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा’; राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदा हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली.. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे, असा सवाल उपस्थिती केला होता. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button