breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

“शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर” ; खासदार अमोल कोल्हे यांनी ‘या’ शिवसेना नेत्याला फटकारले!

पुणे |प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्याही मनात आदर आहे. 100 टक्के आदर आहे. मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सणसणीत टोला लगावला.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटनावरून पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात दोन दिवस चांगलाच राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज आज या दोन्ही बायपासचे आज उद्घाटन केले. मात्र काल म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी या बायपासचे शिवसैनिकांना घेऊन अचानक उद्घाटन केल्याने राज्यात असलेली सेना राष्ट्रवादीच्या महाआघाडीत इथे मात्र बिघाडी दिसून आली.

आज शनिवारी सकाळी खेड बायपास व दुपारी नारायणगाव बायपासची अधिकृत उद्घाटने करत डॉ कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर चांगकीच बोचरी टीका केली. माजी आमदार शरद सोनवणे व माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यावर कोटी केली. “निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी हे काल हे उद्घाटन केलंय. इतक्या वयस्कर व्यक्तीने असं वागणं बर नाही.” असं म्हणत टोला लगावला.

डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी या कामाचा पाठपुरावा आपणच केला असून थेट उपस्थितांना कामाची वर्क ऑर्डर दाखवत आढळराव व सोनावणे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असताना हे दोघे इथे काही लोक म्हणतात, की सगळे चोर एकत्र झाले. दुर्दैवाने या चोराकडे bmw नाही. या चोराला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शुटिंग करावं लागते तेंव्हा त्याच्या घरची चूल पेटते. तेव्हा ज्याच्याकडे bmw आहे ते चोर की ज्यांच्याकडे bmw नाही ते चोर. हे यांचं यांनी ठरवावं’

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत पवार साहेबांमुळे

शिवसंपर्क अभियानावावर बोलताना डॉ कोल्हे म्हणाले की,  “मुख्यमंत्र्यांविषय आमच्याही मनात आदर आहे. 100 टक्के आदर आहे. मुख्यमंत्र्याविषयी आदर नसता तर आता जे आरोप करतात त्यांनी माझी संसदेतील भाषणे बाहेर काढून पाहावीत. त्रास होईल मला संसदेत बोलताना बघून,  पण एकदा भाषण  काढून बघा ना. महाराष्ट्र सरकारची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडत हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही. पण या मुख्यमंत्र्यांनी त्यांची काम लोकांपर्यंत पोहचवावी, महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली पण या अभियानाची काम सोडून फक्त आमच्यावर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एक कलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो माननीय मुख्यमंत्र्याबद्दल आदर आहे मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे.”

काय आहेत शिवाजी आढळराव यांचे आरोप?

पुणे नाशिक महामार्गवरील खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर काल चांगलाच निशाणा साधला व शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला होता. खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले असताना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने आपण पाठपुरावा करुन शनिवारी 17 जुलैला या बाह्यवळणाचे काम पूर्ण होत असताना अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाल्याचे ते म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button