breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

उदयनराजेंची घोषणा, राज्यपालांविरोधात पुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात

। सातारा । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

राज्यपाल पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने जर अशाप्रकारे वक्तव्य केलं असेल तर गप्प बसणार का? आझाद मैदान फार लांब नाही, लवकरचं एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढणार अशी घोषणा खासदार उदयनराजे यांनी केली आहे. ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे आज रायगडावर दाखल झाले असून त्यांनी शिवरायांच्या समाधीला वंदन केले. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना उदयनराजेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली. तसेच, भाजपवरही निशाणा साधला.

राज्यपालांचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. राज्यपालांवर कारवाई व्हावी, यासाठी आता पुढील मोर्चा आझाद मैदानात काढू, अशी घोषणा उदयनराजेंनी केली आहे. यावेळी उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म समभावाचा विचार दिला, यात शिवाजी महाराजांचा काय स्वार्थ होता तो म्हणजे सर्वधर्मियांना अन्याय, जुलमी राजवट, आक्रमणातून सोडवणूक झाली पाहिजे. आदर्श विचार देणाऱ्या राजांची विटंबना होतेय. चित्रपट लिखाण, वक्तव्यातून राजांचा अपमान होतो आणि सर्वजण शांतपणे ऐकूण घेतात. काहीजण सोयीप्रमाणे अर्थ काढतात. तर काही जण समर्थन करण्याचे धाडस दाखवत आहेत. राज्यपालांना असे म्हणायचे नव्हते, त्यांचा असा उद्देश नव्हता, असा बचाव केला जात आहे. या लोकांना लाज वाटली पाहीजे. शिवरायांचा अशाप्रकारे अपमान करण्याचा अधिकार नाही.

शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतरही या विषयाला कलाटणी दिली जाते. त्याला दुजोरा दिला जातो आणि आपण मुग गिळून गप्प पाहत बसलोय. प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देणार आणि आपण ते पाहत बसणार हीच देशातील मोठी चूक झाली. यावर प्रतिक्रिया देत देत आपण प्रतिक्रियावादी झालो आहोत. अंगवळणी पडलयं आणि तेच देशासाठी घातक ठरतयं. हीच आपली चूक आहे. अशी आक्रमक प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.

आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. फक्त शिवाजी महाराजांना वंदन करायचं त्यांचे नाव घ्यायचं पण त्यांचा सर्वधर्म समभाव विचारांची व्याख्याचं सोईप्रमाणे बदलत आहेत. असा आरोपही उदयनराजे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button