पिंपरी / चिंचवडपुणे

रिव्हर रेसिडेन्सी समोर दोन महिलांचे दागिने हिसकावले

पिंपरी l  प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी सोसायटी समोर फिरत असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे तीन लाखांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरटा पळून गेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री नऊ वाजताच्या सुमारास वैष्णवी सोसायटी समोर, रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी येथे घडली.

स्वाती जगेश (वय 30, रा. रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी स्वाती सोसायटी समोर फिरत होत्या. त्यावेळी केटीएम दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी चोरट्याने स्वाती यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीचे सहा तोळ्यांचे गंठण हिसकावले. त्यानंतर गौरी संजय भन्साळे या महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. दागिने हिसकवल्या नंतर चोरटा दुचाकीवरून वेगाने पळून गेला. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button