breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दोन मजली इमारत, १० प्लॉट, अडीच कोटींच्या ठेवी…; सरकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड!

मुंबई |

एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यवधी रुपये सापडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. दक्षता विभागाने शुक्रवारी सुंदरगड अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी बिस्वजित महापात्रा यांच्या मालमत्तेवर छापेमारी केली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता आढळली आहे. दक्षता विभागाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटलंय की, खोर्डा, सुंदरगड आणि जगतसिंगपूर जिल्ह्यातील सात ठिकाणी महापात्रा यांच्या मालमत्तांची झडती घेण्यात आली.

त्यानुसार, भुवनेश्वरमध्ये एक दुमजली इमारत आणि एक फ्लॅट, १० भूखंड आणि २.४२ कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी, विमा आणि इतर गोष्टी सापडल्या आहे. तर, या छापेमारीत ३ लाखांहून अधिक रोख आणि ३५० ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलंय. मोहापात्रा यांचे रुद्रपूर, बलियंता येथील निवासी घर, नयापल्ली, भुवनेश्वर येथील सदनिका, मूळ गाव रेडहुआ येथील घर, जगतसिंगपूर येथील जडातिरा येथील नातेवाईकांचे घर, सुंदरगड शहरातील अधिकृत निवासस्थान, सुंदरगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत कक्ष आणि निवासी निवासस्थानाची झडती सध्या सुरू आहे. याशिवाय महापात्रा यांनी नुकताच भुवनेश्वरमधील बलियंता येथे त्यांच्या पत्नीच्या नावाने सिमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. अहवालानुसार, दक्षता विभागाची वित्त शाखा गोदामातील सिमेंट साठ्याचा तपास आणि त्याचे मूल्यांकन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button