breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात जमावाच्या हल्ल्यात २ पोलीस जखमी

पुणे | प्रतिनिधी 
येरवड्याच्या कोते वस्तीतील म्हाडाच्या सर्वधर्म समभाव वसाहतीत नामचिन गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुरुवारी रात्री ९.३०च्या सुमारास जमावाने हल्ला चढवला. त्यात २ पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या राड्यानंतर शेवटी पोलिसांनी आरोपी शक्ती सिंहला अटक केली.

येरवड्याच्या कोते वस्तीतील म्हाडाच्या सर्वधर्म समभाव सोसायटीत शक्ती सिंह आणि त्याचे साथीदार गुन्हेगारी कारवाया करत होते. त्यांची या परिसरात प्रचंड दहशत होती. याबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरून त्याला पकडण्यासाठी पोलीस गुरुवारी रात्री कोते वस्तीत गेले होते. त्यावेळी शक्ती सिंहने लोकांना जमा केले आणि त्यांना पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी दिली. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. तेव्हा पोलिसांनी स्वःरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला तेव्हा पोलिसांनी शक्ती सिंहला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे येरवडा परिसरात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांवर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button