breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

मुंबई – आज आयपीएलच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आज आयपीएलचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही.

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलचे 30 सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार होते. परंतु कोलकाताच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र वरुण चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी त्याला कोरोनाने गाठले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता कोलकाताचे इतर सर्व खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button