TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळमधील मलप्पुरममध्ये रामायणावर आधारित एका ऑनलाइन स्पर्धेत दोन मुस्लिम तरुणांची बाजी

नवी दिल्लीः केरळमधील मलप्पुरममध्ये रामायणावर आधारित एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून एकूण पाच जणं विजेते झाले असून त्यातील दोन नावांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. विजेत्यांमध्ये दोन मुस्लिम विद्यार्थी असून त्यांची नावे मोहम्मद जाबिर पीके आणि मोहम्मद बसीथ एम अशी आहेत. हे दोघं केकेएचएम इस्लामिक अँड आर्टस कॉलेज वलेनचेरी येथे वेफी कॉर्स करत आहेत. या दोघांच्या यशस्वी वियजानंतर सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.

या स्पर्धेत १ हजाराहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोहम्मद बसीथ एम यांना रामायणातील अनेक अध्याय तोंडपाठ आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. हे दोन्ही विजेते वेफीअंतर्गंत पदव्युत्तर स्तरापर्यंत इस्लामिक अभ्यास करत आहेत. या अभ्यासक्रमात हिंदू धर्म, बौद्ध, जैन आणि शीख धर्माचा अभ्यासही आहे. तसंच, भारतातील धर्मांवरील अभ्यासक्रमही आहे.

रामायण स्पर्धेत भाग घेणाऱ्या जाबिर यांनी सर्व भारतीयांना रामायण आणि महाभारत यांचे वाचन केले पाहिजे. रामायण आणि महाभारत आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. हे ग्रंथाचे वाचन करणे व समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असं विजेता स्पर्धक जाबिर यांनी म्हटलं आहे.

महाकाव्याचा अभ्यास करताना, मला समजले की सर्व धर्मातील लोकांनी एकमेकांच्या धार्मिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. विविध धर्मांचा अभ्यास केल्यास धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यास मदत होईल. सर्व धर्म आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर करायला शिकवतात, असं दुसरा विजेता बसीथ यांनी म्हटलं आहे. पेरिंथलमन्ना येथे राहणारा जबीर हा वेफी पीजीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याने समाजशास्त्रात बीए केले आहे. मोहम्मद बासिथ, एक फेलो विजेता आणि मूळचा ओमनूरचा रहिवासी, वेफीच्या पाचव्या वर्षाचा विद्यार्थी, बीए मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button