breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघे अटकेत

पुणे | प्रतिनिधी 
आरोग्य भरती प्रक्रियेत सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलल्यानं मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर आय़ोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पेपर फुटीच्या घटनेनं खळबळ माजली. यात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात आरोग्य भरती गट क चा पेपर फुटला होता. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. आता पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली असून यात अमरावतीच्या निशिद गायकवाड आणि त्याच्या मित्राचा समवाशे आहे. दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button