पिंपरी / चिंचवड

उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल पळवले

पिंपरी l प्रतिनिधी

उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना आकुर्डी येथे बुधवारी (दि. 18) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

कुणाल रमेश पाटील (वय 21, रा. भोसले बिल्डींग, टीजेएसबी बॅंकेच्या जवळ, आकुर्डी) यांनी बुधवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा ते साडे नऊ वाजताच्या दरम्यान फिर्यादी पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. चोरट्याने 11 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. निगडी पोलीस नाईक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button