पिंपरी / चिंचवड

वाकड आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मतिमंद मुले बेपत्ता

पिंपरी | प्रतिनिधी

वाकड आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मतिमंद बेपत्ता झाली. याप्रकरणी सोमवारी (दि. 20) वाकड आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

दगडूपाटीलनगर, थेरगाव येथून 15 वर्षीय मुलगा शनिवारी (दि. 18) सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला. तो परत आला नसल्याने त्याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रुपीनगर, तळवडे येथील एका सोसायटीमधून 17 वर्षीय मतिमंद मुलगा रविवारी (दि. 19) दुपारी चार वाजताच्या सुमारास बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मुलाला फूस लावून अगर पैशांचे आमिष दाखवून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिंचवडमधून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टीमधून अज्ञात व्यक्तीने 17 वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेल्याची एक फिर्याद एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहा ते सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या कालावधीत घडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button