ताज्या घडामोडीपुणे

भरधाव बीएमडब्लूचा दुभाजकाला धडकून अपघात, दोन जखमी

पुणे | मध्यराञी 02:30 वाजता पुण्यातील म्हाञे पुल, डिपी रस्ता येथे एका भरधाव बीएमडब्लूचा दुभाजकाला धडकून अपघात झाला असून दोन जण यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव बीएमडब्लूचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. यामुळे ड्रायव्हर सीटवरील जखमीचे दोन्ही पाय अडकले होते. अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांनी रेस्क्यु टुलचा वापर करीत 03:50वाजता त्या युवकाची सुटका करुन रुग्णालयात रवाना केले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button