पिंपरी / चिंचवड

बेकायदेशीरपणे गॅस चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा : एकाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

बेकायदेशीर व धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये गॅस काढून त्याची चोरी केली. यासाठी एकाने त्याची जागा उपलब्ध करून दिली. याप्रकरणी गॅस चोरी करणारा आणि जागा उपलब्ध करून देणारा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री सव्वासात वाजता शिंदेवस्ती, रावेत येथे जय मल्हार गॅस रिपेअरिंग नावाच्या दुकानात करण्यात आली.

गणपती चनप्पा मलीशे (वय 25, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल काळूराम भोंडवे (वय 30, रा. शिंदेवस्ती, रावेत) याने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणपती याने धोकायदायकपणे घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये विनापरवाना गॅस काढून गॅसची चोरी केली. याद्वारे आरोपी ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक केली. आरोपी अमोल याने गणपती याला चोरी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी रात्री कारवाई करून गणपती याला अटक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button