पिंपरी / चिंचवड

गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक : दोन लाख 83 हजारांचा गांजा जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

गांजा विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता पिंपरी येथे करण्यात आली. आरोपींकडून दोन लाख 83 हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

गौतम किसन गायकवाड (वय 47, रा. पिंपरी), रेखा पोपटासिंग तामचीकर (वय 38, रा. भाटनगर, पिंपरी), दीपक उर्फ दीपेश इंद्रेकर (वय 24, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील गौतम आणि दीपक यांना पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम याने त्याच्या ताब्यात गांजा बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. त्याच्यासह दीपक याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सहा हजार रुपये रोख रक्कम, दोन लाख 83 हजार रुपयांचा गांजा, दोन हजार 330 रुपयांचे स्टेपलर, पिन, बॉक्स, दोन हजारांचा इलेक्ट्रिक वजनकाटा, सहा हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण तीन लाख एक हजार 80 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button