पिंपरी / चिंचवड

चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी फिरून चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8) रात्री सात वाजता निघोजे गावच्या हद्दीत ए आर ए आय कंपनी समोरील परिसरात करण्यात आली.

सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे (वय 50), सोनू अकुक्ष काळे (वय 35, दोघे रा. गांधीनगर, आंबेडकर झोपडपट्टी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस परिसरात गस्त घालत असताना त्यांना निघोजे गावच्या हद्दीत ए आर ए आय कंपनी समोरील परिसरात दोघेजण संशयितरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे एक दुचाकी, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, पोपट पाना, बॅटरी असा 30 हजार 550 रुपयांचा ऐवज आढळून आला. हा ऐवज जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button