पिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी चिंचवड परिसरात घडली.

लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय 18, रा. चिंचवड), रोहित रमेश सुतार (वय 21, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 12 वर्षीय मुलगी चुलतीच्या घरी पिठाचा डबा देण्यासाठी गेली. डबा देऊन घरी येत असताना आरोपी लक्ष्मण याने मुलीला आरोपी रोहित याच्या खोलीत उचलून नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. ‘मी तुझ्यासोबत जे केले आहे, ते कोणाला सांगितले तर मी तुला आणि तुझया घरच्यांना मारून टाकीन’ अशी लक्ष्मण याने धमकी दिली. त्यानंतर आरोपी रोहित यानेही पीडित मुलीवर बलात्कार केला. 9 मे रोजी रात्री साडेसात वाजता पीडित मुलगी घराच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडत असताना आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button