पिंपरी l प्रतिनिधी
घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोन तरुणांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवारी (दि. १६) सायंकाळी कृष्णानगर भाजी मंडई, मोरेवस्ती येथे करण्यात आली.
लखन उर्फ लक्ष्मण बसवराज गाडेकर (वय २४, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), रुपेश प्रमोद ठाकूर (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक नरहरी नाणेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच्याकडे शस्त्र बाळगली असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णानगर येथील भाजीमंडईत सापळा लावून कारवाई करत लखन आणि रुपेश यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक तलवार आणि एक चाकू आढळून आला. दोघांना अटक करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.