पिंपरी / चिंचवड
पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी l प्रतिनिधी
वाकड पोलिसांनी रविवारी (दि. 19) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
वाकड पोलिसांनी रविवारी (दि. 19) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
अजित रामलखन यादव (वय 25, रा. काळेवाडी. मूळ रा. मध्य प्रदेश), हिमाचल अतरसिंग रावत (वय 24, रा. काळेवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवर दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. पोलिसांनी अजित आणि हिमाचल या दोघांना ताब्यात घेतले. अजित यादव यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.