पिंपरी / चिंचवड

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 21) सकाळी संतनगर भोसरी येथे करण्यात आली.

अतुल दिलीप भागवत (वय 37, रा. चिंचवड), सुनील अनंता पिसाळ (वय 36, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण मुळूक यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी मधील स्पाईन रोडवर संत नगर येथे एका कारमध्ये दोघेजण आले असून त्यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त करत दोघांना अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button