TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मावळ मधील दोन महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीसाठी आमदार शेळके यांनी मानले अजित पवार यांचे आभार

पुणे | मावळ तालुक्यातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात शुक्रवारी (दि. 11) सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 11) विधिमंडळात राज्याचा सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस्थळास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या समाधीस्थळाचा विकास आणि परिसरातील सुशोभीकरण करण्यासाठी 10 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

मावळ मधील पर्यटन वाढीला चालना मिळण्यासाठी लोणावळा-खंडाळा येथील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट याठिकाणी ग्लास स्कायवॉकची उभारणी आणि इतर आवश्यक पर्यटन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लोणावळा टायगर पॉइंटवरून दिसणारे विहंगम दृश्य पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या ठिकाणी स्कायवॉक झाल्यानंतर इथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

या अर्थसंकल्पातून सुमारे दीडशे कोटी रुपयांचे प्रकल्प उभे राहणार आहेत. यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळेल. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडी सरकारचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार, असे ट्विट मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button