पिंपरी / चिंचवड

चाकण परीसरात दोन अपघात : दोघांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण परिसरात शनिवारी एक आणि रविवारी एक असे दोन अपघात झाले. या दोन्ही अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. 19) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर एक अपघात झाला. अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परमेश्वर दिलीप कुंभार (वय 30, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ किशोर संभाजी कुंभार (वय 27, रा. दिघी) यांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

भांबोली गावच्या हद्दीत वासुली फाटा ते आंबेठाण रोडवर रविवारी (दि. 19) सकाळी दुसरा अपघात झाला. या अपघातात खेमा शंकर उगले (वय 40, रा. टेकावडे, ता. खेड) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सागर खेमा उगले (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ रघुनाथ मोरे (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोरे याने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून मयत खेमा यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button