पिंपरी / चिंचवड

एमआयडीसी भोसरी, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात : तिघांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

मोशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर चाकण येथे पिकअपच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी रविवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजपाल घमेंडी सिंह (वय 32 रा. नाणेकरवाडी, चाकण ता. खेड, जि. पुणे) असे मोशी येथील अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मयत राजपाल हे आपल्या दुचाकीवरून मोशी चौक ते आळंदी रोडने चालले होते. ते दाजीबा हॉटेल जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजपाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

केतन माणिकराव धोंडगे, विलास घुले अशी चाकण येथील अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गोरख जकाते हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संग्राम पंडितराव सावंत (वय 39, रा. कडाचीवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक राहुल पोपट वाळुंजकर (रा. बहुरगाव, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत केतन आणि त्याचे मित्र गोरख व विलास असे तिघेजण दुचाकीवरून वासोली येथील कंपनीत  शनिवारी (दि. 8) दुपारी तीन वाजताच्या सुमारास कामावर जात होते. आंबेठाण गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला आरोपी पिकअप चालकाने धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यात केतन व विलास यांचा मृत्यू झाला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button