ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बारा वर्षानंतर 104 जणांना मिळाली हक्काची घरे – उत्तम केंदळे

पिंपरी चिंचवड | सेक्टर नं 22 (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक) या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 104 कुटुंबांना महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर मिळली आहेत. नुकत्याच झालेल्या लकी ड्रॉ मध्ये एसआरए प्रकल्पाअंतर्गत गरिबांना घरे मिळाली. 104 कुटुंबाचे विठ्ठलनगर येथे पुनर्वसन झाले असल्याची माहिती नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी दिली.घरे मिळाल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमला घोलप, बापू घोलप, संजय वाघमारे व लाभार्थी उपस्थित होते.नगरसेवक केंदळे म्हणाले, सेक्टर नंबर 22 (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक( या झोपडपट्टी भागात 365 घरे आहेत. 2009 साली JNNURM प्रकल्पाअंतर्गत 193 नागरीक पात्र ठरले होते. 2011 साली दोन सोसायट्याचा लकी ड्रॉ करण्यात आला होता. घरे मिळालेल्यांचे लोन पास झाले होते.

रेड झोनची याचिका दाखल झाल्यामुळे तीन बिल्डिंग तशाच पडून राहिल्या. 2011 चा लकी ड्रॉ झाल्यापासून आतापर्यंत 45 आंदोलने, मोर्चे, बेमुदत धरणे आंदोलन करून देखील नागरिकांना न्याय मिळत नव्हता. ऑटो क्लस्टर येथे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत बैठका पार पडली. परंतु घरे मिळण्याचा तोडगा निघाला नाही.हर्डीकर यांची बदली झाल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर घराचा प्रश्न उपस्थित केला. आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांच्या समोर बैठका व प्रश्न मांडण्यात दोन महिने वेळ गेला. एका बैठकीत राजेश पाटील यांनी तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी एसआरए प्रकल्प, पीएमवाय योजनांतर्गत किंवा न्यायालयात याचिका दाखल करू असे आश्वासन दिले होते.

त्यानंतर आता कुठेतरी 17 नोव्हेंबर 21 रोजी 160 पैकी 104 लोकांचे लकी ड्रॉद्वारे विठ्ठलनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पाटील व संजय वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button