breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिका-यांच्या भोंगळ कारभारामुळे त्रिवेणीनगरचा विद्युत पुरवठा तब्बल 21 तास खंडीत

  • केबल जळाल्याचे कारण सांगून दुरूस्तीबाबत अधिका-यांनी केली टाळाटाळ
  • शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांच्या पाठपुराव्यानंतर वीज सुरळीत

पिंपरी / महाईन्यूज

विद्युत केबल जळाल्यामुळे त्रिवेणीनगर भागातील विजपुरवठा तब्बल 21 तास खंडीत झाला. महावितरणच्या स्थानिक अधिका-यांकडे तक्रार करून देखील त्यांनी केबल उपलब्ध नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर दिले. शेवटी शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांनी गणेशखिंड विद्युत कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पंकज तगदपल्लीवर यांच्याशी संपर्क साधून माहिती सांगितली. त्यावर तातडीने सुत्रे हलवून तगदपल्लीवर साहेबांच्या अथक प्रयत्नांनंतर त्रिवेणीनगर भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

रुपीनगर महावितरण प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सोमवारी (दि. 12) सकाळी सातच्या सुमारास त्रिवेणीनगर भागातील विद्युत केबल जळाली. त्यामुळे या भागातील सुमारे 800 घरे, व्यापारी संकुले आणि आयकॉन रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. नागरिकांची प्रचंड हेळसांड झाली. कोरोना विषाणुने बाधीत झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे असंख्य रुग्ण घरातच होम क्वारंटाईन होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. अशातच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या भागातील आयकॉन रुग्णालयात देखील अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला. ही बाब शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण पाटील यांनी विभागप्रमुख नितीन बोंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोंडे यांनी तातडीने महावितरणचे सहायक अभियंते, अति कार्यकारी अभियंते चौधरी, कार्यकारी अभियंते गवारे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, केबल उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.

स्थानिक पातळीवरील अधिका-यांची उदासिनता लक्षात येताच नितीन बोंडे यांनी लागलीच गणेशखिंड विद्युत कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पंकज तगदपल्लीवर साहेबांशी संपर्क साधला. स्थानिक पातळीवर केबल उपलब्ध नसल्यामुळे त्रिवेणीनगर भागातील नागरिकांना विजेअभावी उकाड्याचा सामना करावा लागत आहे. रात्री अपरात्री विज नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होणार असून यातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे बोंडे यांनी तगदपल्लीवर साहेबांना सायंकाळी सहा वाजता सांगितले. त्यावर त्यांनी तातडीने सुत्रे हलवून रात्री दहा वाजता केबल उपलब्ध करून दिली. कसल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण झालेच पाहिजे, असे सक्त आदेश त्यांनी स्थानिक अधिका-यांना दिले. त्यावर तातडीने अधिका-यांनी जाग्यावर येऊन नवीन केबल कार्यान्वीत करण्याचे काम हाती घेतले. रात्री दोन वाजता केबल टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यासाठी तगदपल्लीवार साहेबांनी काम पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांना आणखीन होणारा त्रास टळल्याचे समाधान शिवसेना विभागप्रमुख बोंडे यांनी व्यक्त केले.

विद्युत केबल दुरूस्तीवेळी शिवसेना शाखाप्रमुख सहदेव चव्हाण, मोहन जाधव, युवासेना पदाधिकारी अभिजित गिरी, सौरभ मोरे, अमित शिंदे, सुनिल समगिर, तसेच ज्येष्ठ शिवसैनिक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button