पिंपरी / चिंचवड

गणेश स्कूलच्या विद्यार्थ्यांची कलाविष्कारातून रावत यांना श्रद्धांजली

– सी डी एस रावत यांच्या सैन्यदलातील आठवणींना उजाळा

पिंपरी l प्रतिनिधी

दापोडी येथील एस. एस. पी शिक्षण संस्थेच्या नेवाळे वस्ती येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि सिनियर सेकंडरी शाळेत कलाविष्कारातुन सी. डी. एस. जनरल दिवंगत बिपिन रावत यांना श्रध्दांजली अर्पण केली. कर्नल सुधीर सिन्हा यांनी सी डी एस जनरल बिपीन रावत यांच्या सैन्यदलातील आठवणींना यावेळी उजाळा दिला.

विद्यार्थ्यांना दिवंगत बिपीन रावत यांच्या सैन्यदलातील गौरवास्पद कार्याची माहिती मिळावी तसेच देशसेवेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रति विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सुधीर सिन्हा, सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर, गायक व संगीतकार तुषार रिठे, व्यवसायिक अनिल पटेल, जयराम शर्मा, विक्रम काळे, संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, चंद्रशेखर पाटील, मल्लिका ताराके, प्रकाश गायकवाड, सुनील शेवाळे, प्राचार्य दत्तात्रय घारे, डॉ. प्रविण साबळे, सिओना त्रिभुवन, मुख्याध्यापिका अग्नेस मस्करेहान्स, मुख्याध्यापिका जोशी, उपमुख्याध्यापिका प्रिया नेवाळे, पर्यवेक्षिका अश्विनी खरवडे, संस्थेचे शिक्षक व सेवेकरी वर्ग यावेळी उपस्थित होते.

कर्नल सिन्हा यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. कर्नल सिन्हा यांनी आपले मित्र दिवंगत रावत यांच्या कार्याचा व त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. देशसेवेसाठी तरूणांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन कर्नल सिन्हा यांनी यावेळी केले. प्रिया नेवाळे यांनी आभार मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button