breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीनाशिक

गद्दार… गद्दार… नाशिकमध्ये शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे, उद्धव ठाकरे समर्थक संतप्त

नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडताना दिसते आहे. काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांना शिवसेना कार्यकर्त्यांचे समर्थनही मिळत आहे. पण काही ठिकाणी निषेध होतानाही दिसतोय. नाशिकमध्ये संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पोस्टरवर अंडे मारून फेकले आणि शाईही फेकली.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तर बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंविरोधात नारेबाजी केली. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर शाईफेकत काळे फासले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला शिवसेना कार्यकर्त्यांनी काळे फासले. शहरातील अनेक भागांमध्ये एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती.
मात्र, आता कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांकडून याला विरोध होतोय. शहरात शिंदे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आले. गांधीनगर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आधी एकनाथ शिंदेंच्या पोस्टरवर शाईफेक करत काळे फासले. यानंतर पोस्टवर अंडे मारून फेकले. यावेळी एकनाथ शिंदेंविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी नारेही देली. एकनाथ शिंदेचा निषेधही केला. शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल. विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा दावा राऊत यांनी केला आहे. बंडखोर उमेदवारांनी अतिशय चुकीचे पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button