breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रायपूर स्थानकात रेल्वेत स्फोट; सीआरपीएफचे ६ जवान जखमी

रायपूर – छत्तीसगडची राजधानी रायपूर रेल्वे स्थानकात आज सकाळी ६.३० च्या सुमारास विशेष रेल्वेत स्फोट झाला. त्यात सीआरपीएफचे ६ जवान जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकात प्रचंड खळबळ माजली.

झारसुगुडा येथून जम्मू तवीकडे जात असलेली सीआरपीएफची विशेष ट्रेन सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रायपूर स्थानकाच्या फलाट नंबर २ वर उभी होती. त्यावेळी या ट्रेनमध्ये काडतूसांच्या पेट्या चढवण्यात येत होत्या. त्यावेळी ९ नंबरच्या बोगीजवळ एक पेटी खाली पडली आणि तिचा स्फोट झाला. त्यात ६ जवान जखमी झाले. त्यांना रायपूरच्या नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर सकाळी ७.१५ वाजता ही ट्रेन पुढे रवाना झाली. यात कोणीही सामान्य प्रवासी जखमी झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button