breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना सरसकट मालमत्ता करमाफी

मुंबई | प्रतिनिधी 
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पालिकेने पाठविला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विधानसभेत ही माहिती दिली.

काल मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकूण अठरा निर्णय घेण्यात आले आहे. यात मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती. स्वयंपूनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधील लाखो प्रकल्पबधितांना दिलासा, सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातींसाठीच्या १६५ निवासी शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर, एसआरएमधल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत एकूण २८ लाख रहिवाशी घरे असून त्यापैकी १५ लाख घरे ही ५०० चौरस फुटापर्यंतची आहेत. या घरांना मालमत्ता कर माफ झाल्याने मुंबई महाहालिकेचे दरवर्षी ३४० कोटी रूपयांचे उत्पन्न होणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button