breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
कोल्हापुरात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पाणीपातळी तब्बल 10 फुटांनी वाढली
कोल्हापूर – सलग कोसळणार्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील 12 तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल 10 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदी 24 फुटांवरून वाहत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील माजगावच्या छोट्या पुलाचा रस्ता वाहून गेला असून शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता ब्लॉक झाला आहे. तर भडगाव पूल पाण्याखाली गेला असून गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.