breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Tokyo Paralympics: भालाफेकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी, सुमित अंतिलने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अगदी सुवर्णमय ठरत आहे. भारताने सकाळपासून स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक जिंकलं असून दिवसभरातील हे पाचवं पदक आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून आज सकाळीच महिला नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकल होतं.

सुमितने सुवर्णपदक जिंकलेल्या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळेस स्वत:चेच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो सुमितने 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवं वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.

सुमित कायमच पैलवान होऊन कुस्ती खेळू इच्छित होता. पण एका अपघातात त्याचं हे स्वप्न तुटलं. योगेश्वर दत्त यांना पाहून कुस्ती शिकणाऱ्या सुमितचं 2015 मध्ये रोड एक्सीडंट झालं. तो दुचाकीवरुन जात असताना एका ट्रॅक्टरचा धक्का लागला. ज्यात ट्रॅक्टर त्याच्या पायावर चढला आणि तो पाय गमावून बसला. पण त्यानंतरही त्याने मेहनत घेत भालाफेक खेळांत स्वत:ला झोकून दिलं. ज्यानंतर आज अखेर सुवर्णपदक जिंकत भारताचं नाव जगभरात केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button