breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात आज ५९ हजार नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाखांवर

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून गेल्या काही दिवसांपासून नियमित ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ होत आहे. आज राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यातच, आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचे रुग्ण होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण सापडले. तर, आज २७८ मृतांची नोंद झाली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० झाला आहे. यामध्ये ६ लाख १२ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आज ३९ हजार ६२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आलं आहे. आतापर्यंत २ कोटी २८ लाख २ हजार २०० नमुन्यांपैकी ३५ लाख ७८ हजार १६९ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या २८ हजार ४९४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button