ताज्या घडामोडीपुणे

राज्यात उष्माघाताचे दहा बळी?

पुणे |  राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ९८ रुग्णांना उष्माघाताचा फटका बसला असून, पैकी १० रुग्ण दगावले आहेत. उष्माघाताचा फटका बसलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची पाहणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

गेल्या काही आठवड्यापासून राज्यात उन्हाचा चटका वाढला आहेत. अधिक वेळ उन्हाळात काम केल्याने किंवा कामानिमित्ताने उन्हात फिरल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. राज्यात आतापर्यंत ९८ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर विभागात आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे विभागात पाच रुग्ण आढळले होते. त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली. त्यामुळे विभागातील रुग्णसंख्या ९२ वरून ९८ पर्यंत पोहोचली. दहा मृतांमध्ये पुणे विभागातील एकाचाही समावेश नाही. मृतांमध्ये अकोला, अमरावती, हिंगोली, जालना, उस्मानाबाद येथील प्रत्येकी एक रुग्ण, जळगावमधील तीन आणि नागपूरमधील दोघांचा समावेश आहे.

‘हवामान विभाग पुढील पाच दिवसांमध्ये उष्माघाताचा अॅलर्ट दिला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व आरोग्याशी संबंधित संस्था उष्माघातावरील उपचारासाठी सुसज्ज करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती आरोग्य विभागाचे रोग पाहणी अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

उष्माघाताच्या रुग्णांची स्थिती

९८

आतापर्यंतचे एकूण रुग्ण

६२

नागपूर विभाग

१५

अकोला विभाग

नाशिक विभाग

औरंगाबाद

एक

लातूर विभाग

पुणे विभाग

उष्माघाताचे संशयित मृत्यू : १०

जळगाव

नागपूर

प्रत्येकी १

अकोला, अमरावती, हिंगोली, जालना, उस्मानाबाद

उष्माघाताची लक्षणे काय?

चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे, भूक न लागणे, निरुत्साही होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता

उष्माघाताचा त्रास कोणाला?

अर्भक, लहान मुले, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणारे, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्ती, खेळाडू; तसेच बराच वेळ घराबाहेर काम करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो.

राज्यात एक मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांची पाहणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व डॉक्टरांचे उष्माघात प्रतिबंधक, नियंत्रण आणि रुग्णांचे व्यवस्थापन यांचे ऑनलाइन प्रशिक्षण बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे.

– डॉ. प्रदीप आवटे, रोग सर्वेक्षण अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button