breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टू दी पॉईंट : स्मार्ट सिटीतील कामांबाबत आरोप करणाऱ्यांच्या डोळ्यांत वस्तुदर्शी ‘अंजन’

पिंपरी-चिंचवड राज्यात आघाडीवर : सहसचिव कुणाल कुमार यांचा दावा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात काही कामे सुरू झाली. काही पूर्णत्वाच्या दिशेने प्रगतीपथावर आहेत. असे असताना राजकीय मंडळींसह काहीजण स्मार्ट सिटीच्या कामाबाबत प्रशासनावर टीकेचा भडीमार करीत आहेत. अशा टीकाकारांच्या डोळ्यांत वस्तुदर्शी ‘अंजन’ पडले आहे. कारण, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर तथा सह सचिव कुणाल कुमार यांनी पिंपरी-चिंचवड राज्यात आघाडीवर असल्याचा दावा केला आहे.
पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची आहे. एखादी योजना आणि तिचे फायदे प्रत्यक्षात येण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. शहरात कामे सुरू आहेत. मात्र, राजकीय हेतुपुरस्सर आरोप आणि आक्षेप नोंदवण्याची स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून शहरात लागली आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणे हा एकमेव अजेंडा दिसतो.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर तथा सह सचिव कुणाल कुमार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी केली. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. राज्यात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी विकास कामांत आघाडीवर आहे. जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, नागरिकांसाठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प कसे उपयुक्त ठरतील, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, व्हॉटसअप, फेसबुक तसेच प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पांची जनजागृती करा, अशा सूचना देखील त्यांनी केली.
केंद्रीय पातळीवरील एखादा सनदी अधिकारी शहरात आल्यानंतर एखाद्या प्रकल्पाचे कौतूक करतो. किंबहूना राज्यात शहर स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये आघाडीवर असल्याचा दावा करतो, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांसाठी समाधानकारक असायला हवी. एखाद्या नेत्याचे केलेले वक्तव्य राजकीय हेतुने केलेले असेल, पण प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने बोलतो, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांनी लक्षात घेतली पाहिजे. मात्र, याकडे राजकीय हेतूने सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
स्मार्ट सिटीतून कोणते प्रकल्प होणार आहेत…
सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, मुन्सीपल ई– क्लास रुम, स्कुल हेल्थ मॉनिटरिंग, पब्लीक ई- टॉयलेट, सिटी मोबाईल ऍ़प अँड सोशल मिडीया, ई-क्लास रुम, पर्यावरण सेन्सर, स्मार्ट ट्राफिक, सिटी सर्व्हेलन्स, स्मार्ट पार्कींग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क, इंटीग्रेटेड कमांड कट्रोल सेंटर, ऑप्टीकल फायबर केबल, स्मार्ट वाटर सप्लाय, पब्लीक वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट सेव्हरेज, आयसीटी इनॅबल एसडब्लुएम, स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टयु पार्क अँड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी, जीआयएस इनॅबल इआरपी इन्क्लुडींग मुनिसीपल सर्व्हीस लेव्हल बेंच मेकींग, युनीक स्मार्ट ऍ़ड्रेसिंग अँड ऑनलाईन इस्टॅब्लीशमेंट लायसींग्स असे विविध प्रकल्प होणार आहेत.
आता काय सुरू आहे?
पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत राजमाता जिजाऊ उद्यान व पार्किंग व्यवस्था, रस्ते, फुटपाथ, आझादी का अमृत महोत्सव निमीत्त ज्येष्ठ नागरिकांसाठीची ओपन जिम, बैठक व्यवस्था, सुदर्शन चौक येथे सलग ७५ तासांत उभारण्यात आलेले “८ टू ८० पार्क” तसेच शहरामध्ये अर्बन स्ट्रीट अंतर्गत रस्ते व सायकल ट्रॅकची कामे सध्यस्थितीला सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button