पुणे

कोर्टाचे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी लाच घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने आरोपीच्या विरोधात वॉरंट काढले. ते वॉरंट रद्द करून घेण्यासाठी सहाय्यक पोलीस फौजदाराने दोन हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई मंगळवारी (दि. 28) घोडेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.कोंडाजी दामोदर रेंगडे (वय 53) असे कारवाई झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याची सुनावणी घोडेगाव कोर्टात सुरु आहे. या सुनावणी तक्रारदार न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदार यांच्या विरुद्ध वॉरंट काढले. ते वॉरंट रद्द करून घेण्यासाठी सहाय्यक फौजदार कोंडाजी रेंगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

तडजोड करून दोन हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने मंगळवारी याप्रकरणाची पडताळणी केली. सहाय्यक फौजदार दोन हजारांची लाच घेताना एसीबीला रंगेहाथ सापडला आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. एसीबी पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button