ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मित्राच्या लग्नामध्ये काढलेल्या शेवंतीत नाचून थकला, पुढे जे घडले ते धक्कादायकच…

परभणी | मित्राच्या लग्नामध्ये काढलेल्या शेवंतीत नाचून थकलेल्या एका युवकाने थंड पाणी पिल्यानंतर त्याला उलट्या होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना परभणी येथे घडली आहे. सोहम धनंजय शहाणे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

असा घडला सर्व प्रकार…

परभणीच्या जिंतूर येथील सराफा व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा सोहम हा मित्राच्या लग्नासाठी १५ एप्रिल रोजी भर दुपारी उन्हात मोटारसायकलवरून परभणी येथे आला होता. लग्नातील शेवंतीमध्ये नाचल्यानंतर तो थकला होता. तहान लागल्याने त्याने थंड पिले आणि अचानक त्याला उलटी झाली. त्यामुळे परभणी शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना सोहम शहाणे याचा मृत्यू झाला. त्यामुळे शहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

दरम्यान, सोहम शहाणे याचा मृत्यू नेमका उष्माघाताने झाला की हृदयविकाराचा झटका येऊन, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. सोहम याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button