breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
घरात फ्रिजवर ठेवलेले तीन मोबाईल व रोख रक्कम चोरीला
पिंपरी |
घरात फ्रिजवर ठेवलेले तीन मोबाईल व रोख रक्कम असा 1 लाख 40 हजार रुपयांची चोरी झाली आहे. काशिद कॉलनी, क्रांतीनगर, पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि.25) ही घटना घडली. तुषार जयवंत पोळ (वय 32, रा. काशिद कॉलनी, क्रांतीनगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात फ्रिजवर 1 लाख 30 हजार किंमतीचे तीन मोबाईल फोन, व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेले आहेत. एकूण 1 लाख 40 हजार रुपयांची चोरी झाली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.