पिंपरी / चिंचवड

नेहरूनगर येथे घरातून नकळत तीन लाखांचे दागिने पळवले

पिंपरी l प्रतिनिधी

नेहरूनगर येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मे 2022 या कालावधीत घडली.

रामचंद्र कविचंद भाट (वय 55, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने नकळत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button