breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णांकडून पैसे घेणा-या तीन डाॅक्टरांना 6 मेपर्यंत कोठडी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करून घेण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये घेणाऱ्या तीन डॉक्टरांना ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्पर्शचे डॉ. प्रवीण शांतवन जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक भरत राळे व डॉ. सचिन श्रीरंग कसबे अशी अटक आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदासनगर, चिखलीगाव) यांना १९ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना वाल्हेकरवाडीतील ऑक्सिकेअर रुग्णालयात दाखले केले. तेथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने व प्रकृती खालावल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची शोधाशोध सुरु झाली. दरम्यान, नातेवाईकांच्या ओळखीचा व्यक्ती बालाजी मोरे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉ. सचिन कसबे याच्याशी संपर्क केला. रुग्णाच्या नातेवाईकाच्या असहायतेचा फायदा घेऊन कसबे याने आयसीयू बेड उपलब्ध करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. नाईलाजास्तव नातेवाईक पैसे देण्यास तयार झाले असता कसबे याने वाल्हेकरवाडीतील पदमजा रुग्णालयातील सहकारी डॉ. शशांक भरत राळे याच्या मार्फतीने स्पर्श प्रा. ली. कन्सल्टन्ट डॉ. प्रवीण जाधव याच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महापालिकेच्या ऑटो क्लस्टर कोविड सेन्टरमध्ये बेड उपलब्ध झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

दरम्यान, डॉ. सचिन कसबे याला त्याचा मध्यस्थी राहुल काळे या व्यक्तीद्वारे रुग्णाच्या नातेवाईकांकडून २३ एप्रिलला दुपारी एक लाख देण्यात आले. रुग्णाला त्याठिकाणी ऍडमिट केल्यानंतर सायंकाळी डॉ. प्रवीण जाधव याने डॉ. राळे यांच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले. तर उर्वरित वीस हजार डॉ. शशांक राळे व डॉ. सचिन कसबे यांनी ठेवून घेतले. याप्रकरणी तीनही डॉक्टरांवर खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button