ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाला धमकी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

पिंपरी चिंचवड | आपल्या मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून मुलीच्या वडिलांनी एका तरुणाला धमकी दिली. त्यानंतर तरुणाने खडकी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी धमकी देणारा व्यक्ती आणि त्याच्या मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पिंपळे गुरव आणि खडकी रेल्वे स्टेशन येथे घडला.शैलेंद्र वीरेंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शैलेंद्र यांच्या आई शोभा वीरेंद्र कांबळे (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. विकास वानखेडे पूजा विकास वानखेडे (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास यांना दोन मुली आहेत. फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. विकास यांना त्यांच्या एका मुलीसोबत फिर्यादी यांचा मुलगा शैलेंद्र यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यावरून विकास यांनी शैलेंद्र याच्यावर घाणेरडे व खोटे आरोप केले.

शैलेंद्र याला मारून त्याचे मुंडके फिर्यादी यांच्या हातात देण्याची धमकी दिली. शैलेंद्र याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याला बेइज्जत करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून शैलेंद्र याने 22 नोव्हेंबर रोजी रात्री खडकी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सांगवी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button