ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हॉट्सअप चॅट दाखवण्याची धमकी ; जिम ट्रेनरवर गुन्हा दाखल

सोलापूर |डाएट प्लॅन आणि वर्कआऊट इन्स्ट्रक्शनच्या नावाखाली विवाहित महिलेला त्रास तर दिलाच, शिवाय व्हॉट्सअप चॅट दाखवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या एका जिम ट्रेनरला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह आपली शारीरिक तंदुरुस्ती रहावी यासाठी पंढरपूर येथील एका नामांकित जिममध्ये प्रवेश घेतला. आपले शरीर तंदुरुस्त व फिट राहावे यासाठी जिममधील प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी फिटनेस विषयक माहितीसाठी विवाहित स्त्रीचा फोन नंबर घेतला. त्यानंतर या महिलेला वारंवार फोन आणि व्हाट्सअप मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्नही करु लागला. त्यावेळी ती महिला आपल्या जिम प्रशिक्षणाला समजावत त्याला फोन किंवा मेसेजेस न करण्याची विनंती केली. फिटनेसबाबत काही सांगायचे असल्यास मी जिममध्ये आल्यानंतर सांगत जा, असे वारंवार सांगून देखील जिम ट्रेनर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी कंटाळून पती आणि पत्नीने जिम सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आरोपीने त्या विवाहित महिलेला व्हाट्सअपमधील चॅटिंगचे स्क्रिन शॉट आणि फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. वारंवार सांगूनही जिम ट्रेनरने त्रास देणे सुरूच ठेवले. हा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित महिलेने आपल्या पतीसमवेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन जिम ट्रेनर श्रीकांत राजू गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली

या गुन्ह्याचा तपासमध्ये आरोपी प्रशिक्षकाबाबत अधिक माहिती उजेडात आली आहे. हा प्रशिक्षक जिथे तिथे प्रशिक्षकाचे काम करत होता, तेथे तेथे त्याने महिलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडवत होता असे पोलिस तपासात उघड झाले आहे. हा आरोपी महिला व मुलींशी गोड बोलून त्यांच्या शारीरिक रचनेची स्तुती करून त्यांच्याशी मोबाइल चॅटिंग करायचा. त्यानंतर तो त्यांना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा असे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी केले आवाहन

याबद्दल पोलिसांनी जिममध्ये जाऊन महिला व मुलींची छळवणूक झाली असल्यास आरोपीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येऊन आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे. या प्रकरणात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. पंढरपूर निर्भया पथकातील प्रशांत भागवत, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, पोलीस नाईक प्रसाद औटी, महिला पोलीस कॉन्स्टेबल कुसुम क्षीररसागर आणि अविनाश रोडगे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button