ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

‘माझे पाय धरणारे आज माझ्यावर आणि पवारांवर बोलायला लागले’; खडसेंचा निशाणा कोणाकडे

जळगाव | जनतेने आम्हाला ४०-४० वर्ष निवडून दिले आणि त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यंतीपर्यंत पोहोचलो. पण आज माझे पाय, बोट धरणारे पोरं मला शिकवायला लागले आणि शरद पवारांवर बोलायला लागले, मला आश्चर्य वाटते या गोष्टीचे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.

जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका…

‘जयंत पाटील यांना मी म्हणायचो तुम्ही खूप साधे-भोळे आहात. दिलीप वळसे-पाटील यांनाही अनेकदा सांगितले की तुम्ही गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. शेकडो प्रकरण आहेत, एकदा दणका दाखवाच. दोन-चार लोकांना आत टाकले असते तर ही परिस्थिती आली नसती’, असंही खडसे यावेळी म्हणाले. तसेचं जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचे राजकारण करू नका, पण ज्यांनी केलं आहे त्यांना ते भोगायला लावा. तर ही परिस्थिती निर्माण होणार नाही. जनतेच्या मनातील ही इच्छा आहे, असंही बोलायला खडसे विसरले नाही.

‘हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेके डुबेंगे’…

अनिल देशमुखांच्या विषयावर देखील खडसे म्हणाले की, अनिल देशमुखांवर १००च्या वर धाडी पडतात. मलाही भूखंडाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. काय संबंध. घेणे नाही देणे नाही. हा त्याचा मास्टरमाईंड आहे असे बोलतात. व्यवहार किती कोटींचा, पण काय चालतयं. ‘तुम तो जेल जाने वाले है’ बोलतात, पण ‘हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेके डुबेंगे’, असे म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं.

‘महाविकास आघाडी सरकारला बदनाम केल्याचा प्रयत्न केला जातो. काही नसताना १००च्या वर धाडी घालता. काही नसताना आरोप-प्रत्योरोप करत राहता, मग काही असताना का नको, जे सत्य आहे ते समोर आणले पाहिजे’, अशी विनंती देखील एकनाथ खडसेंनी सरकारला केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button