ताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेला जनाबसेना असं संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा,

संजय राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेला जनाबसेना असं संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती देण्यासाठी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून एमआयएमला आघाडीच्या ऑफरची सूचना देण्यात आली. एमआयएमची ऑफर म्हणजे भाजपचा कट आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी गैरसमज पसरवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बदनाम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणून संबोधणाऱ्या भाजपने आपला इतिहास विसरू नये. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारी भाजप आहे. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केले? हे फुटीरतावादी, दहशतवाद्यांसोबत असणारा हा पक्ष आहे, असेही आम्ही भाजपला बजावले होते, असे यावेळी राऊत यांनी म्हटले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button