TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…ही गर्दी शिलवंत यांच्या कार्याची पोहोच पावती: माजी आमदार विलास लांडे

अशोक शिलवंत यांचा स्मतीदिन : विविध पुरस्कारांचे वितरण

पिंपरी : अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत हे सम्राट अशोक यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा ठसा आहे. त्यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे माजी नगरसेविका सुलक्षाण शिलवंत चालवत आहेत. त्यामुळे समाजाला कधीही शिलवंत साहेबांची उणीव भासणार नाही. आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेली गर्दी ही स्व. शिलवंत यांच्या प्रेमापोटी आणि सुलक्षणा यांच्या कार्याची पाहोच पावती आहे, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक स्मृतीशेष डॉ. अशोक शिलवंत यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी आमदार लांडे बोलत होते.
यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, अॅड. राजरत्न शिलवंत, शिलरत्न शिलवंत, कल्पना शिलवंत यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, वैशाली काळभोर, माजी उपमहापौर तुषार हिंगे, फजल शेख, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, मुक्ताताई पडवळ,अमिना पानसरे, स्मिताताई कुलकर्णी, माई काटे, तुषार कामठे आदी उपस्थित होते.
यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित व डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना समर्पित ‘मुक्तजातक- बुद्धजातक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, हृदय तपासणी, बिपी-शुगर तपासणी, रक्ताची पातळी तपासणी आदी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :
डॉ. अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, समाजभूषण पुरस्कार : डॉ. बबन जोगदंड, आयु. शरद जाधव, साहित्यदीप पुरस्कार: कवयत्री जोत्स्ना चांदगुडे यांना प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button