ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘हा माझा एरिया आहे’, म्हणत गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की; एकास अटक

पिंपरी चिंचवड | ‘तुम्ही इथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत’ असे म्हणत एका मद्यपीने थेट गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार काल (मंगळवारी) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास साईनाथनगर, निगडी येथे घडला.अतुल अरूण कांबळे (वय 34, रा. साईबाबा मंदिर पवळ परिश्रम हाऊसिंग सोसायटी, यमुनानगर निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक सचिन मोरे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुन्हे शाखा युनिट एकमध्ये कार्यरत आहेत. बुधवारी मध्यरात्री फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस निगडी परिसरात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. साईनाथनगर, निगडी येथे दुर्गामाता मंदिराजवळ पोलीस आले असता आरोपी आतुल दुचाकीवरून तिथे आला. तो अंमली पदार्थांच्या नशेत होता.

अतुलने दुचाकी थांबवून फिर्यादी यांना ‘तुम्ही येथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत’ असे म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांची ओळख सांगितली असता ‘तुम्ही पोलीस असले म्हणून काय झाले माझ्या एरियात काय करताय’ असे म्हणून अतुल याने पोलिसांसोबत वाद घातला. पोलिसांना शिवीगाळ करून फिर्यादी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button