breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्रयस्थ संस्था तपासणार पाणीपुरवठा, जलनि:सारण कामांची गुणवत्ता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाकडील विकास कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. महापालिकेसाठी गुणवत्ता व दर्जा तपासणीचे काम त्रयस्थ संस्था म्हणून क्वालीटी सर्व्हीस अ‍ॅण्ड सोल्युशन्स (क्युएसएस) यांना देण्यात येणार आहे. त्यांना निविदा दराच्या जी कमी असेल त्या रकमेच्या 0.20 टक्के या दराने शुल्क दिले जाणार आहे.

नागरिकांना पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. या कामाअंतर्गत रस्ते, पुल, इमारती, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, किरकोळ देखभाल दुरूस्ती आदी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. या विकास कामांचा दर्जा व गुणवत्ता योग्य मानांकाप्रमाणे राखण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच सन 2005 मध्ये एसजीएस इंडीया लिमिटेड आणि आरआयटीईएस या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेमार्फत पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाकडील कामांची पाईप व इतर साहित्याची गुणवत्ता तपासणी करण्यात येते. त्यासाठी संबंधित ठेकेदारामार्फत त्यांचे शुल्क देण्यात येते.

सद्यस्थितीत शहर अभियंता कार्यालयाकडील तसेच बीआरटीएस विभागाकडील चालू कामांची एसजीएस आणि आयआरएस या त्रयस्थ संस्थांमार्फत तपासणी करण्यात येते. निविदा रकमेच्या 0.40 टक्के या दराने त्याचे तपासणी शुल्क महापालिकेमार्फत देण्यात येते. सद्यस्थितीत चालू व नियोजित कामांची व्याप्ती लक्षात घेता एसजीएस व्यतिरिक्त त्यांच्यासारखेच काम करणारी एखादी संस्था पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाकडील विकास कामांची गुणवत्ता तपासणीसाठी असणे आवश्यक आहे. या संस्थेने पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागास त्यांच्याकडील अर्ज 21 जून 2018 आणि 17 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केले आहेत.

या संस्था देशात अशा प्रकारच्या कामांकरिता थर्ट पार्टी इन्सपेक्शन म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेची एकूण 29 कार्यालये देशात आहेत. सद्यस्थितीत क्वालीटी सर्व्हीस अ‍ॅण्ड सोल्युशन्स (क्युएसएस) ही संस्था एमआयडीसी, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, नागपूर, औरंगाबाद, सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका तसेच जल स्वराज्य व पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस विनियामक बोर्ड आदी विविध ठिकाणी विविध क्षेत्रात थर्ड पार्टी इन्सपेक्शन करत आहे. त्यांच्याकडे त्याची मान्यताही आहे. क्युएसएस यांनी अद्यापपर्यंत सर्व प्रकारचे पाईप, सर्व प्रकारचे पंप व पाण्याचे मीटर, कंट्रोल पॅनलस, पावर ट्रान्सफोरमर्स, साहित्य खरेदी व त्याचे परिक्षण अशा स्वरूपाची कामे केली आहेत. त्यांनी महापालिकेसाठी गुणवत्ता व दर्जा तपासणीचे काम त्रयस्थ संस्था म्हणून करायची तयारी दर्शविली आहे. तसेच मटेरियल टेस्टींग व अ‍ॅक्टीविटी आदी कामे नियमितपणे करून त्याचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यासाठी सह शहर अभियंता यांना अहवाल सादर करणार आहेत.

क्युएसएस या संस्थेलाही एसजीएस या संस्थेस देय असलेल्या शुल्कानुसार म्हणजेच निविदा रक्कम अथवा निविदा दरासह येणारी रक्कम यापैकी जी कमी असेल त्या रकमेच्या 0.20 टक्के अधिक कर या दराने शुल्क द्यावे लागणार आहे. ही बीले त्या कामाच्या तरतुदीमधून देण्यात येतील. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाच्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातील ज्या कामांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक केलेली नाही, अशी कामे क्युएसएस संस्थेस तपासणीसाठी देण्यात येणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button