तृतीयपंथ्यास मारहाण करून लुटले : तृतीयपंथ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
मैना उर्फ दिनेश पोतदार (वय 30, रा. भारतमाता चौक, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तृतीयपंथ्याचे नाव आहे. याप्रकरणी सनी उर्फ साया राजेंद्र वडमारे (वय 26, रा. चिंबळी फाटा, चाकण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी तृतीयपंथी आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांची मैत्रीण विद्या पाटील आणि रूम पार्टनर हे लांडेवाडी येथे बंद पडलेल्या शाळेसमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘तुम्ही इथे कशासाठी थांबले आहेत’ असे म्हणून आरोपीने फिर्यादीसोबत भांडण केले. दगड, हेल्मेट आणि कमरेच्या पट्ट्याने फिर्यादी आणि त्यांच्या रूम पार्टनरला आरोपीने मारहाण केली. फिर्यादीच्या हातातील सात हजार रुपये असलेली पर्स आरोपीने हिसकावून नेली. यात फिर्यादी यांच्या पाठीवर, डोक्यात, हाताला, तोंडाला मार लागून दुखापत झाली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.