breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

पंढरीत येणाऱ्या भाविकांवर चोरटय़ांची तिरडी नजर

  • धर्मशाळेतून भाविकाचा ४ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास

पंढरपूर |

चोरटय़ांनी आता इथे येणाऱ्या भाविकांवर लक्ष केले आहे. येथील धर्मशाळेत पालघर तालुक्यातील भाविकाच्या खोलीतून सोने, मोबइल, रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ३६ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. या आधी भाविकांचे सोने, दागिने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. पंढरीत दर्शनासाठी भाविक मोठय़ा श्रद्धेने येतात. मात्र आता येणाऱ्या भाविकांना वेगळय़ाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने, पर्स आदींच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या. आता त्या पुढे जाऊन चोरटय़ांनी भाविक ज्या धर्मशाळेत उतरतात तेथे जाऊन चोरी करण्याचे धाडस केले.

पालघर जिल्ह्यातील जांभुळवाडा येथील भाविक सचिन चिंतामण माळवी हे आपल्या कुटुंबीयासह चंद्रभागा काठावरील आगरी धर्मशाळेत मुक्कामास आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी त्यांची पत्नी चंद्रभाग नदीमध्ये स्नानास गेली. मात्र जाताना त्यांनी दरवाजा अर्धवट उघडाच ठेवला होता. याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरटय़ाने त्यांच्या खोलीत प्रवेश करून आतील एक बॅग लंपास केली. दरम्यान साडेपाच वाजता माळवी यांच्या पत्नी धर्मशाळेतील खोलीत परत आल्या असता खुंटीला अडकवलेली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी पती सचिन माळवी यांना झोपेतून उठविले व बॅगेचा शोध घेतला. या वेळी चोरी झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या बॅगेमधून चोरटय़ाने रोख ६० हजार रुपये, २ लाख ४० हजार रुपये किमतीची पाच तोळे सोन्याची चेन, ९६ हजार रुपये किमतीच्या एक तोळय़ाच्या दोन अंगठय़ा, २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व १५ हजार रुपये किमतीचे हातातील घडय़ाळ असा एकूण ४ लाख ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या बाबत सचिन साळवी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आगरी धर्मशाळेत लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये सदर चोर आत प्रवेश करीत असल्याचे तसेच हातात बॅग घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे. या बाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button